१६.१ प्रभाव- काम करण्याची प्रेरणा देणारा आणि अयोग्य ते होऊ न देणारा

पुरुषोत्तमदास आणि एफ. इ. दिनशा यांची नावे आरबीआयच्या संचालकपदासाठी कलम १५(३) द्वारे मुंबई समभाग रजिस्टरचे प्रतिनिधी म्हणून सुचवण्यात आली. बॅंकेच्या नियमावलीनुसार कलम ८ (१) ब खाली ४ संचालकांची नावं सुचवण्यात येणार होती त्याशिवाय मुंबई, कलकत्ता, दिल्ली, मद्रास आणि रंगून अशा वेगवेगळ्या रजिस्टर्समधील समभागधारकांचे प्रतिनिधी म्हणून सुरुवातीचे आठही संचालक कलम १५ (३ द्वारे) गव्हर्नर जनरल निवडणार होते. डिसेंबर, १९३५ मध्ये पश्चिम प्रदेशाच्या (मुंबई प्रदेशाच्या) निवडलेल्या स्थानिक संचालक मंडळाने बॅंकेच्या केंद्रीय मंडळासाठी आपल्यातून २ संचालक निवडून देण्यासाठी मतदान केलं. त्यानंतर गव्हर्नर जनरलनी त्या पदासाठी नियुक्त केलेल्या संचालकांच्या जागी हे निवडून आलेले लोक बसणार होते. केंद्रीय मंडळात संचालक म्हणून जाण्यासाठी पुरुषोत्तमदास आणि एफ.इ. दिनशा यांची एकमताने निवड झाली. या मंडळावर पुरुषोत्तमदास जवळ जवळ २२ वर्षे राहिले. फक्त श्री. श्रीराम (२६ वर्षे) आणि श्री. बी. एम. बिर्ला आणि सी. आर. श्रीनिवासन (प्रत्येकी २४ वर्षे)  एवढेच लोक त्यांच्याहून जास्त काळ राहिले असतील.