लेखक, अनुवादक आणि सहाय्यक टीम

लेखक: बख्तियार दादाभॉय

Bakhtiyar Dadabhoy

श्री बख्तियार दादाभॉय हे पारशी समाजातील लेखक आहेत. त्यांनी पारशी समाजातील मान्यवर व्यक्तींची चरित्रे लिहिली आहेत. त्यांचा जन्म तेलंगणामधील सिकंदराबाद येथे झाला आणि त्यांनी हिंदू कॉलेज. दिल्ली युनिव्हर्सिटी येथून आपले शिक्षण पूर्ण केले. 
त्यांच्या उल्लेखनीय पुस्तकात खालील पुस्तकांचा समावेश होतो.
(१) "Jeh", A Life of J.R.D. Tata । 'जेह', अ लाईफ ऑफ जेआरडी टाटा (जेआरडी टाटांचे आयुष्य) 
(२) Sugar in Milk: Lives of Eminent Parsis । शुगर इन मिल्क: लाईव्हस ऑफ इमिनंट पारसीज (जशी दुधात साखर: पारशी मान्यवरांची चरित्रे) 
(३) Zubin Mehta: A Musical Journey । झुबिन मेहता: अ म्युझिकल जर्नी (झुबिन मेहता: एक संगीतमयी प्रवास)
(३) Barons of Banking: Glimpses of Indian Banking History । बॅरन्स ऑफ बँकिंग : ग्लिम्प्सेस ऑफ इंडियन बँकिंग हिस्टरी (बँकिंगचे शिलेदार: भारतीय बँकिंग इतिहासाची झलक) 
(४) The Magnificent Diwan: The Life and Times of Sir Salar Jung I द मॅग्निफिसंट दिवाण : द लाईफ अँड टाईम्स ऑफ सर सालारजंग १ (प्रभावी दिवाण : सर सालारजंग पहिले यांचे आयुष्य)
(५) A Book of Cricket Days । द बुक ऑफ क्रिकेट डेज (क्रिकेटच्या त्या दिवसांचे पुस्तक)
(६) A Dictionary of Dates । डिक्शनरी ऑफ डेट्स (तारखांची डिक्शनरी)

अनुवादक : सविता दामले 

सविता दामले या मराठीतील अनुवादिका, लेखिका आणि कवयित्री असून त्यांनी पत्रकारितेची पदविकाही घेतली आहे. 
त्या स्टेट बॅंक ऑफ इंडिया येथे कार्यरत होत्या परंतु साहित्याची अत्यंत आवड असल्याने २०१३ साली त्यांनी बॅंकेतून स्वेच्छानिवृत्ती घेऊन लेखन हाच पूर्ण वेळ व्यवसाय स्वीकारला 
आत्तापर्यंत त्यांनी साहित्य अकादमी, राजहंस, मनोविकास, डायमंड, पॉप्युलर, मेहता, मंजुल, मधुश्री, ग्रंथाली अशा मराठीतील सुप्रसिद्ध प्रकाशकांसाठी ४५ हून अधिक इंग्रजी पुस्तके अनुवादित केली आहेत. तसेच स्वतंत्र लेखनही केले आहे. जेरुसलेम- एक चरित्रकथा, ह्युमनकाईंड, नेहरूंची सावली, मनगंगेच्या काठावर, मेलिंडा गेट्स यांचे मोमेंट ऑफ लिफ्ट आणि गन्स, जर्म्स ऍंड स्टील इत्यादी त्यांचे अनुवाद लोकप्रिय झाले आहेत.
स्वतंत्र लेखनात सुप्रसिद्ध लावणीगायिका सुलोचनाबाई चव्हाण ह्यांच्या ‘माझे गाणे माझे जगणे या चरित्राचा समावेश आहे. तसेच किशोरवयीन मुलांसाठी त्यांनी रतन टाटा आणि शर्मिला इरोम यांची चरित्रे लिहिली आहेत. 
त्यांचा ‘पाखरांची शाळा’ हा बालकविता संग्रह आणि ‘चालले मी संगतीने’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे. ‘चालले मी संगतीने’ याच नावाने स्वलिखित गीतांचा आल्बम निघाला असून वैशाली सामंत, साधना सरगम इत्यादींनी त्यातील गीते गायली आहेत. 
फॅमिली ट्री या गुलजार लिखित लेखाचा अनुवाद त्यांनी ऋतुरंग मासिकाच्या २००६ सालच्या दिवाळी अंकासाठी केला होता. दहावी इंग्रजी माध्यमाच्या मराठीच्या पुस्तकात हा अनुवाद समाविष्ट करण्यात आला होता. तसंच,‘नापास मुलांची गोष्ट’ ह्या पुस्तकासाठी गुलजार ह्यांचा ‘ते दिवस’ हा लेख अनुवादित केला होता. ते पुस्तक एफ वाय बीएच्या अभ्यासक्रमाला आहे. 
त्याशिवाय अंतर्नाद, अनुभव, लोकसत्ता, ऋतुरंग, सकाळ आदी अनेक मासिकात आणि वृत्तपत्रांत लेख, अनुवादित कथा, मुलाखती, कविता इत्यादी प्रसिद्ध होत असतात. सकाळ वृत्तपत्रात ‘नोकरीचाकरी’ हे सदरलेखनही त्यांनी केले आहे. 
त्यांना आत्तापर्यंत अनुवादाचे पुढील पुरस्कार मिळाले आहेत. १) मनगंगेच्या काठावर’ ह्या राजहंस प्रकाशित पुस्तकाला २०१३ सालचा इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिरातर्फे उत्कृष्ट अनुवादाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. 
२) सोनिया गांधी-ललित चरित्र या राजहंस प्रकाशित पुस्तकाला श्रीस्थानक, ठाणे येथील ग्रंथालयाचा २०१८ सालचा उत्कृष्ट अनुवादाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.
३) गांधी सचित्र जीवन दर्शन या मंजुल पब्लिशिंग हाऊस प्रकाशित अनुवादास शिवाजीराव चव्हाण ग्रंथालय, सातारा येथे २०१९ सालचा उत्कृष्ट अनुवादाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे.
४) मराठी अनुवाद क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल २०२० साली यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, महिला व्यासपीठ, मुंबई यांच्यातर्फे साहित्य पुरस्कार मिळाला आहे.

प्रूफ रिडींग : क्षिप्रा टुमणे

क्षिप्रा टुमणे पुण्यात स्थायिक असून त्यांनी सायकोलॉजीमध्ये बी ए केलेले आहे. शकुन ट्रांसलाईन्स या कंपनीत आणि मंगेश इंटरप्राइझेस या केमिकल प्रॉडक्शन युनिटमध्ये त्या अकाउंट्स आणि ऍडमिन विभाग सांभाळतात.

 

 

 

 

ऑनलाईन सेटिंग : शिल्पा केळकर

शिल्पा केळकर अमेरिकेतील ऍरिझोना येथे स्थायिक असून त्यांनी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनियरिंग मधून इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स या विषयात अभियंत्याचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या त्या वेरास रिटेल या अमेरिकन कंपनीत प्रॅक्टिस डायरेक्टर म्हणून कार्यरत असून, जगभरातील रिटेल चेन स्टोर्ससाठी संगणकीय प्रणाली बनविणे आणि राबविणे या क्षेत्रात त्यांची कंपनी काम करते.

 

 

 

 

साईट डिझाईन आणि तंत्र सहाय्य : प्रसाद शिरगावकर

Prasad Shirgaonkar प्रसाद शिरगावकर शिक्षणाने कॉस्ट अकाउंटंट असून व्यवसायाने तंत्रज्ञ आहेत. काव्य, कथा आणि ललित लेखनामध्ये विशेष रूची असलेल्या प्रसाद यांनी गेली अनेक वर्षे अनेक वर्तमानपत्रे, नियतकालिके व ऑनलाईन फोरम्सवर नियमित लिखाण केले आहे. त्यांची साधं सोपं डॉट कॉम ही स्वतःची कवितांची वेबसाईट प्रसिद्ध आहे. ‘i-बाप’ हा आधनिु क काळातील वडील व मलु गा यांच्या नात्यावरचा स्फुटलेख वजा कविता संग्रह, ‘सुखांचेसॅशे’ हा ललित लेख संग्रह आणि ‘भटक्याची डायरी’ हा जगभरातल्या अनेक देशांतील प्रवासांदरम्यान लिहिलेला लेख संग्रह प्रकाशित झालेला आहे. त्याशिवाय ‘प्रासादिक’ ह्या संपूर्णपणे एका माणसानं लिहिलेल्या मोबाईल दिवाळी अंकाचं ते गेले आठ वर्षे लेखन-संपादन करीत आहेत. ‘फोटोशाळा’ नावाच्या मराठी मधनू फोटोग्राफीचं प्रशिक्षण देणाऱ्या वेब-चॅनलचे ते निर्माते आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या २८ वर्षांच्या अनुभवातील गेली १६ वर्षे ते ड्रुपल या मुक्तस्त्रोत प्रणालीवर काम करीत असून या प्रणालीचे तज्ज्ञ म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत आहेत. 

 

संकल्पना, समन्वय आणि जनसंपर्क : आनंद मोरे

Anand Moreआनंद मोरे शिक्षणाने चार्टर्ड अकाउंटंट असून व्यवसायाने.शिक्षक आहेत.  गेली २५हून अधिक वर्षे ते सीएच्या मुंबई आणि पुण्यातील विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत. त्यांच्या www.anandmore.com ब्लॉगला २०१७मध्ये एबीपी माझाच सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला होता. लोकप्रिय मराठी वृत्तपत्रात रविवार पुरवणीत अर्थविषयक प्रासंगिक मुद्द्यांवर त्यांचे लिखाण प्रसिद्ध होत असते.