अक्षरध्वनीचा प्रवास!

वर्ष असेल २०१४-१५. अजून मुंबईतील स्ट्रॅन्ड बुक स्टॉल बंद व्हायला काही वर्षे बाकी होती. मी सीए करत असताना जेव्हा इन्स्टिट्यूटच्या कुलाबा ऑफिसला जायचो तेव्हा स्ट्रॅन्ड बुक स्टॉलला एक चक्कर व्हायची. तिथली ती नवीकोरी इंग्रजी पुस्तके, भरगच्च कपाटे, कोपऱ्यात बसलेले स्पष्ट मराठी बोलणारे साधे मराठी कर्मचारी आणि एकदा भेटलेले टी एन शानभाग, यांचं माझ्या मनावर प्रचंड गारुड झालेलं होतं. श्री शानभाग गेल्यावरही तिथून भरपूर इंग्रजी पुस्तके घेतली होती. आणि मग २०१४-१५ मध्ये एका फेरीत हाती लागलं Barons of Banking.