२१.१ स्टर्लिंग बॅलन्सेस
भारताला स्टर्लिंग बॅलन्सेसची पुष्कळच चिंता वाटत होती, त्यामुळेच या त्रस्त करणार्या मुद्द्याचा समावेश फंडाच्या उद्दिष्टांत करावा म्हणून ब्रेटन वूड्स परिषदेत भारताने प्रयत्न केला हे आपल्याला माहिती आहेच. त्यात त्यांना अपयश आलं तरी केन्सकडून आश्वासन मिळवण्यात ते यशस्वी झाले की हा मुद्दा तुम्ही आणि आम्ही (इंग्लंड) द्विपक्षीय पातळीवर सोडवू,’’ तुम्हाला सन्मानाने आणि औदार्यभावनेने दिले जाते ते सगळे आम्ही देऊ.’’ असं केन्सनं सांगितलं. युद्धकाळात आणि नंतरही भारतीयांना मनस्ताप ठरलेल्या या महत्वाच्या मुद्द्यातून मार्ग काढण्यामागची पार्श्वभूमी आणि वाटाघाटी काय झाल्या त्या ते या प्रकरणात आपण तपासणार आहोत. केन्सनी सरतेशेवटी या बॅलन्सेसबद्दलच्या इंग्लंडच्या बांधिलकीचा आम्ही स्वीकार करू असं म्हटलं असलं तरी १९४४ साली त्यांनी इकॉनॉमिस्ट साप्ताहिकासाठी लेख लिहिला त्यातून तर सूचित होत होतं की युद्धाबाबतच्या आर्थिक समझोत्याबद्दल १९४० साली त्यानं जे विचार मांडले त्याबद्दल नव्यानं वाटाघाटी झाल्या पाहिजेत असं त्यांना वाटतंय. पुरुषोत्तमदास आणि अन्य लोकांना तर ते वाचून वाटलं की इंग्लंडवर भारताचं जे कर्ज आहे त्या कर्जातून हात झटकून टाकण्याचा हा प्रकार दिसतोय.