६.१ विनिमय दर
पुरुषोत्तमदासांच्या विधिमंडळातील कारकीर्दीचा बराचसा भर रूपया-शिलिंग गुणोत्तराच्या सर्वज्ञात वादविवादाचे युद्ध लढण्यात गेला, त्यांचं वर्णन करताना आनंद चंदावरकर म्हणतात की ते ‘राजा चार्ल्सच्या’ भारतीय आर्थिक इतिहासातील प्रमुख व्यक्ती होते. नोकरशाही आणि उद्योजकांच्या सामर्थ्यशाली गटाच्या पाठीशी ठामपणे उभ्या असलेल्या ब्रिटिश हितसंबंधांविरूद्ध पुरुषोत्तमदास जवळजवळ एका हातीच लढत होते. त्यांना रूपयाचा विनिमय दर १ शिलिंग ४ डाईम असायला हवा होता, प्रत्यक्षात तो १ शिलिंग ६ डाईम होता. भारताच्या आर्थिक हितसंबंधास हा दर मारक आहे असं त्यांचं मत होतं. याच प्रश्नाभोवती एक धर्मयुद्ध लढलं जाणार होतं आणि पुरुषोत्तमदास त्यात आघाडीची भूमिका निभावणार होते.