१७.३ टेलर यांचे निधन (Need review)

१७ फेब्रुवारी, १९४३ या दिवशी अल्पकालीन आजाराने गव्हर्नर टेलर यांचं निधन झालं त्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी कुणाला नेमायचं यावरून त्या महायुद्धाच्या त्या कालखंडात जेवढं नाट्य निर्माण झालं तेवढं बॅंकेच्या अन्य कुठल्याही कार्यक्षेत्रात झालेलं नसेल. तसंच त्या जागी देशमुखांची नियुक्ती व्हावी यासाठी पुरुषोत्तमदासांनी दाखवलेली अथक चिकाटी, स्वतंत्र विचार आणि आग्रही वृत्ती अन्य कुठल्याही लढ्यात उठून दिसली नसेल. त्यांनी कष्ट घेतले नसते तर देशाला ज्या काळात पहिला भारतीय गव्हर्नर मिळाला त्या काळात तो नक्कीच मिळाला नसता असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरू नये.

टेलरच्या अनपेक्षित निधनापर्यंतचे प्रसंग देशमुखांनी आपल्या आठवणींत लिहिले आहेत. फेब्रुवारी, १९४३ च्या प्रारंभी ते टेलरसोबत बॅंकेच्या कामानिमित्त दिल्लीला गेले तिथं ते वित्त सदस्य सर जेरेमी राईस्मन यांच्याकडे राहिले. त्यानंतर टेलर यांच्या काही दिवस आधी देशमुख मुंबईस परतले. त्यानंतर टेलर परतले त्या दिवशी सकाळीच ते देशमुखांच्या दालनात येऊन म्हणाले की ,’’ मला खूप थकल्यासारखं वाटतंय, मी घरी जाऊन विश्रांती घेतो.’’ देशमुखांनाही वाटलं की टेलर यांची तब्येत बरी दिसत नाहीये परंतु त्यात फार गंभीर असावं असं त्यांना वाटलं नाही. मग संध्याकाळी ते टेलरना भेटायला कार्मायकेल रोडवरील त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांना खूप सर्दी आणि ताप आलेला दिसला. ‘मी  एक दोन दिवसांत बरा होईन,’ असं टेलरनी त्यांना आश्वासनही दिलं परंतु दुसर्‍या दिवशी त्यांची प्रकृती जास्तच बिघडली (तेव्हा त्यांची पत्नी इंग्लंडला गेलेली होती) तेव्हा मग त्यांच्यासोबत राहाणार्‍या बर्मा शेलमधील मित्रानं त्या काळात मुंबईत उपस्थित असलेल्या ब्रिटिश वैद्यकीय तज्ञांना मदतीसाठी पाचारण केलं. तेव्हा त्या तज्ञांनी टेलरना कॉरोनरी थ्रॉंबॉसिस (ह्रदयाच्या रक्तप्रवाहात अडथळ्याचा विकार) झाला आहे असं निदान केलं आणि उपचारही सांगितले. तथापि, सर्व काळजी घेऊनही १७ फेब्रुवारी रोजी टेलर निवर्तले. त्यांच्या निधनानिमित्त आरबीआय समितीतर्फे शोकसभा आयोजित करण्यात आली. तिचं अध्यक्षपद देशमुखांनी भूषविलं तसंच पुरुषोत्तमदास, सर होमी मेहता, सर सुलतान चिनॉय, सर आर्थर ब्रुस इत्यादी लोक त्यास उपस्थित राहिले होते. निधनाचं कारण कॉरोनरी थ्रॉंबॉसिस, न्युमोनिया आणि ह्रदयविकाराचा झटका असं लिहिण्यात आलं होतं. देशमुख आणि सहकारी अधिकार्‍यांनी त्यांची शवपेटिका उचलली. दफनविधीस मोठमोठे बॅंकर्स आणि उद्योजक मोठ्या संख्येने हजर होते. टेलरच्या अकाली निधनाचा राईस्मनना प्रचंड धक्का बसला कारण दोघंही आयसीएसमधून आलेले होतेच परंतु त्यांच्यात चांगली मैत्रीही होती.

टेलर यांचे निधन झाल्यावर देशभरात त्यांचा उत्तराधिकारी कोण याबद्दल भरपूर अंदाज वर्तवण्यात आले. सर्वसामान्य परिस्थितीत सरकारला त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यात काहीच अडचण आली नसती कारण देशमुख जवळजवळ १४ महिने उपगव्हर्नर पदावर होते. त्यांचं आरबीआयमधलं आणि सरकारी सेवेमधलं रेकॉर्डही प्रभावी होतं. म्हणजे त्यांच्यासमोर असा एक माणूस उपलब्ध होता ज्याच्याकडे मृत टेलरच्या हातून लगाम घेण्यासाठी लागणारी सगळी विश्वासार्हता आणि आवश्यक ती जडणघडण होती. परंतु लवकरच स्पष्ट झालं की देशातील ब्रिटिशधार्जिण्या कंपूने इंपिरियल बॅंकेचे व्यवस्थापकीय गव्हर्नर सर विल्यम लेमंड यांच्या पारड्यात आपलं वजन टाकलं आहे.  त्याशिवाय लंडनमधील एक विख्यात वित्ततज्ञास त्या पदावर नेमण्याबद्दलच्याही वावड्या उठू लागल्या. सर ऑटो निम्येरसारख्या विख्यात व्यक्तीला गव्हर्नर म्हणून नेमलं पाहिजे असंही आडून आडून सुचवलं जाऊ लागलं परंतु केंद्रीय संचालक मंडळाकडून यातील कुठल्याही बातमीस समर्थन मिळत नव्हतं. देशमुखांनी त्यानंतर बर्‍याच वर्षांनी लिहिलेल्या आठवणीत नोंदवलं आहे की भारत सरकार इथल्या लोकांच्या पाठिंब्याविना दुसरं महायुद्ध लढत होतं त्यामुळे टेलरच्या जागी एका भारतीयाची नेमणूक करणं त्यांना धोक्याचं वाटत होतं.

टेलरच्या निधनामुळे सरकारसमोर अचानकपणे द्विधा परिस्थिती उद्भवली. म्हणजे  एवढी की देशमुखांनी गव्हर्नरची कामे आणि अधिकार आपल्या हाती घ्यावेत असा अध्यादेशही  त्यांनी टेलरच्या निधनानंतर पाच दिवसांनी म्हणजे २२ फेब्रुवारीला काढला. त्यावरून दिसून येतं की देशमुखांच्या हाती तात्पुरत्या स्वरूपातही गव्हर्नरची कामेही सोपवण्याची सरकारची इच्छा नव्हती. [K3]  एवढंच नाही तर त्यांना केंद्रीय संचालक मंडळाची मीटिंग बोलावण्याचीसुद्धा घाई नव्हती. इकडे संचालकांनाही तातडी नव्हती कारण हा काळ त्यांनी आपले उमेदवार देशमुख यांच्यासाठी लोकांचा पाठिंबा मिळवण्यात व्यतीत केला. संचालक मंडळातील निवडून आलेल्या सदस्यांनी (खास करून बी. एम. बिर्लांनी) पुरुषोत्तमदासांच्या नेतृत्वाखाली देशमुखांच्या उमेदवारीसाठी सक्रिय प्रचार करायला सुरुवात केली. संचालकांपैकी केवळ एकालाच अभारतीय गव्हर्नर हवा होता परंतु नंतर त्याचंही मन वळवण्यात आलं. देशमुखांनी त्यांचा आठवणींत लिहून ठेवलंय की फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यापासून ते १३ ऑगस्ट, १९४३ पर्यंत म्हणजे ज्या दिवशी रिझर्व्ह बॅंकेचा गव्हर्नर म्हणून माझं नाव जाहीर झालं त्या दिवसापर्यंतचा सगळा काळ अनेक खेळ्या, प्रति-खेळ्यांचा नुसता गुंता झाला होता. गव्हर्नरच्या जागेवर कुणी बसावं यासाठी खंडीभर पत्रापत्रीही झाली.’’

 

 [K3]pl check