'अक्षरध्वनी'विषयी माहिती

अक्षरध्वनी लर्निंग फाउंडेशन कंपनी कायद्याच्या कलम आठ अन्वये स्थापन झालेली कंपनी आहे. नफा कमविणे हा कंपनीचा उद्देश नसून प्रादेशिक भाषांत जगभरातील ज्ञान भाषांतरीत करून आणणे आणि ते भारतीयांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हे अक्षरध्वनी लर्निंग फाउंडेशनचे ध्येय आहे. अक्षरध्वनीच्या कामाची सुरुवात मराठी भाषेपासून केली आहे. 

भाषांतराचे हे काम सर्व ज्ञानशाखांना कवेत घेण्यासाठी असले तरी सुरुवात सामाजिक शास्त्रांपासून केली आहे. त्यातही प्रामुख्याने अर्थविषयक विचारांना मराठीत आणण्याला प्राधान्य दिले आहे. अन्य विषयही या प्रकल्पात समाविष्ट करण्याचा अथक प्रयत्न अक्षरध्वनी लर्निंग फाउंडेशन करत राहील. 

संस्थापक सदस्य:
श्री आनंद मोरे (चार्टर्ड अकाउंटंट)
श्रीमती शैलजा मोरे (एम बी ए)
श्री विशाल व्यास (कॉर्पोरेट ट्रेनर आणि आयटी सल्लागार)
श्री हृषीकेश कुलकर्णी (एम बी बी एस, एम डी)
श्री देवदत्त राजाध्यक्ष (चार्टर्ड अकाउंटंट)
श्री श्रीनिकेत देशपांडे (एल एल बी)
श्री अभिजीत पळणीटकर (कॉम्प्युटर इंजिनिअर)