बॅरन्स ऑफ बँकिंग

हे पुस्तक म्हणजे मागील शतकात भारतीय बॅंकिंगचा विकास कसा झाला तेच केवळ सांगणारा इतिहास नाही, तसंच या क्षेत्रावर प्रभाव पाडणा-या सहा व्यक्तिमत्वांच्या चरित्रात्मक गोषवा-याचा संग्रहही नाही. तथापि, एका अर्थी या  पुस्तकात या दोन्हींचा समावेश आहे असं आपण  म्हणू शकतो.  ज्या सहा प्रभावी व्यक्तिमत्वांनी बॅंकिंग क्षेत्रास स्वयंप्रकाशी ता-यासारखं योगदान दिलं. त्या योगदानाने त्या त्या वैयक्तिक संस्थांच्या सीमा ओलांडून संपूर्ण बॅंकिग व्यवसायावरच प्रभाव पाडला. अशा त्या सहा प्रवर्तक व्यक्तिमत्वांच्या योगदानाची सांगड प्रस्तुत लेखकाने  बॅंकिगच्या इतिहासाशी अत्यंत कौशल्याने  घातली आहे.

 

अक्षरध्वनीचा प्रवास!

वर्ष असेल २०१४-१५. अजून मुंबईतील स्ट्रॅन्ड बुक स्टॉल बंद व्हायला काही वर्षे बाकी होती. मी सीए करत असताना जेव्हा इन्स्टिट्यूटच्या कुलाबा ऑफिसला जायचो तेव्हा स्ट्रॅन्ड बुक स्टॉलला एक चक्कर व्हायची. तिथली ती नवीकोरी इंग्रजी पुस्तके, भरगच्च कपाटे, कोपऱ्यात बसलेले स्पष्ट मराठी बोलणारे साधे मराठी कर्मचारी आणि एकदा भेटलेले टी एन शानभाग, यांचं माझ्या मनावर प्रचंड गारुड झालेलं होतं. श्री शानभाग गेल्यावरही तिथून भरपूर इंग्रजी पुस्तके घेतली होती. आणि मग २०१४-१५ मध्ये एका फेरीत हाती लागलं Barons of Banking.